म्हणून जेट एअरवेजच्या १० फेऱ्या रद्द

रविवारी जेट एअरवेज कंपनीकडून देशांतर्गत विमानांच्या दहा फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून तांत्रिक बिघाडामुळे या फेऱ्या रद्द केल्याचे सांगण्यात येत होतं. परंतु, या विमानांना पायलट उपलब्ध नसल्यामुळे या फेऱ्या रद्द केल्याचं एअरलाइनच्या सूत्रांनी सांगितलं आहे. विमानांच्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे विमानतळावरील प्रवाशांची गैरसोय झाली.

प्रवाशांचा खोळंबा

जेट एअरवेज या विमानांमध्ये काही कार्गो विमानांचा देखील समावेश होता. मात्र, फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत थांबून राहावं लागलं होतं. त्यावेळी विमानतळावर असलेल्या प्रवाशांनी जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती विचारली असता, तांत्रिक बिघाडामुळे फेऱ्या रद्द झाल्याचं कारण त्यांनी प्रवाशांना दिलं. शिवाय प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना एसएमएसद्वारे सुचित करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.

म्हणून पायलटची कमी

जेट एरअवेजनं प्रवाशांना होणाऱ्या गैरसोईसाठी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र विमान कंपनीत कार्यरत असलेले पायलट आणि अभियंते यांना त्यांच मानधन वेळेवर मिळत नाही. या कारणामुळे अनेक पायलटनी जेट एअरवेज सोडल्याने या विमान कंपनीत पायलटची कमतरता आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या