प्रवाशांना जीव गमावण्यापासून परावृत्त करणारा यमराज

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

तुम्ही कधी साक्षात यमराजला पाहिलं आहे का? साहजिकच तुमचं उत्तर नाही असंच असेल. पण आज तुम्हाला साक्षात यमराज‌चं दर्शन होणार आहे. होय, पण हा यमराज कोणाचा जीव घेत नाही. तर, जीव वाचवतो.

यमराज मुंबईत

मुंबईच्या मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. स्थानकांवर येणारी ट्रेन घाईत पकडण्याच्या गडबडीत अनेक दुर्घटना घडतात. शिवाय, प्रवासी रेल्वे ट्रॅक क्रॉस करतात. अनेक जण लोकलमध्ये स्टंटबाजी करतात. या सर्व प्रकारांमध्ये जीव जाण्याच्या घटना घडतात. या सर्वांपासून परावृत्त करण्यासाठीच यमराज मुंबई शहरात दाखल झाले आहेत.

प्रवाशांना दिला सल्ला

कुर्ला आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल रमेश माने हे इथल्या प्रवाशांना रेल्वे ट्रॅक क्रॉस न करण्याचा सल्ला देतात. दिवसभर स्थानकात फिरून असं कुणी सापडलं तर त्याला पकडतात. आतापर्यंत २५ जणांना रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना पकडण्यात आलं आहे. ज्यांना समजावून सोडण्यात आलं आहे. शिवाय, त्यांच्याकडून शपथ घेण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या