कधी येणार सरकारला जाग?

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

लालबाग - लालबाग उड्डाणपूल... गेल्या आठवड्यात पुलावर दोन्ही बाजूला भेगा दिसून आल्या आणि हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तर दुसरीकडे त्याचवेळी घोडबंदर येथील वर्सोवा उड्डाणपुलही धोकादायक असल्याचं समोर आलं. या दोन्ही घटनांमुळे उड्डाणपुलाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 2010 मध्ये लालबाग पुलाचे काम सुरु असतानाच पुलाचा भाग कोसळला आणि त्याचवेळी या पुलाच्या बांधकांच्या दर्जावर प्रश्न निर्माण झालाय. कंत्राटदाराला 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला. पण 2011 मध्ये पूलाचे उद्घाटन होऊन काही तास होत नाहीत तोच पुलावर खड्डा पडल्याने पूल चर्चेत आला. त्या दिवसापासून आजपर्यंत या पुलाच्या बाबतीत दुर्घटनांची मालिका सुरूच आहे.

लालबागच नव्हे तर सायन, किंग्ज सर्कल, कलानगर, खेरवाडी, दिंडोशी अशा अनेक उड्डाणपुलांची अल्पावधीतच दुरवस्था झाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या