२० एप्रिलपासून सुटणार एसटी महामंडळाच्या अतिरिक्त बस

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबईसह देशभरात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा दूसरा टप्पा असून, या दुसऱ्या टप्प्यात अनेक सुविधा सुरु होणार आहेत. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवा पुवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळामार्फत २२ बसेसच्या सुमारे १०० फेऱ्या वाढवण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिका आणि इतर अत्यावश्यक सेवेवर काम करणाऱ्यां विभागात ३० टक्के कर्मचारी, अधिकारी उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. लाॅकडाऊनच्या काळात सुरू असलेल्या नियोजीत फेऱ्यांच्या व्यतिरिक्त मंत्रालय आणि इतर ठिकाणांसाठी बसेस चालविण्यात येणार आहे.

राज्य शासनाने सोमवारपासून संचारबंदी थोडी शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या आहे. दरम्यान सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरू आहे. शासनाच्या प्रत्येक विभागात ३० टक्के कर्मचाऱ्यांची वाढ होणार असल्याने, एसटीच्या फेऱ्यांमध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे. 

अशी आहे बसची सुविधा

मुंबई विभाग

  • पनवेल - मंत्रालय - 6

  • मंत्रालय - पनवेल - 6

ठाणे विभाग

  • आसनगाव -मंत्रालय - 2

  • मंत्रालय - आसनगांव - 2

  • बदलापूर - मंत्रालय - 5

  • मंत्रालय - बदलापूर - 5

  • डोंबीवली - मंत्रालय - 5

  • मंत्रालय - डोंबीवली - 5

  • कल्याण - मंत्रालय - 5

  • मंत्रालय - कल्याण - 5

  • शहापूर - मंत्रालय - 3

  • मंत्रालय - शहापूर - 3

  • मिरारोड - मंत्रालय - 3

  • मंत्रालय - मिरारोड - 3

पालघर विभाग

  • विरार - मंत्रालय - 5

  • मंत्रालय- विरार - 5

  • पालघर - मंत्रालय - 5

  • मंत्रालय - पालघर - 5

  • वसई - मंत्रालय - 5

  • मंत्रालय - वसई - 5

  • नालासोपारा - मंत्रालय - 5

  • मंत्रालय - नालासोपारा -  5
पुढील बातमी
इतर बातम्या