मुंबई लोकलच्या प्रवासी संख्येत ११ लाखांनी वाढ

मुंबईच्या लोकलच्या प्रवासीसंख्येत सोमवारी सुमारे ११ लाखांहून अधिक वाढ झाली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमुभा असताना रस्त्यावरील वाहतूककोंडी, इंधनदराची शंभरी आणि करोनाकाळातील बेरोजगारी यांमुळे त्रासलेल्या सर्वसामान्यांनी महापालिकेचे नियम धुडकावून स्वस्त आणि वेगवान रेल्वे प्रवासालाच प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले.

सर्वसामान्यांना लोकल प्रवासमुभा देण्याबाबतचे आपल्या कक्षेतील अधिकार राज्य सरकारने मुंबई महापालिकेला दिले आहेत. या अधिकारांचा वापर करत महापालिकेने सर्वसामान्यांवरील लोकलबंदी कायम ठेवली आहे. मध्य रेल्वेवर सोमवारी १९ लाख ३१ हजार ७४४ प्रवाशांची नोंद करण्यात आली.

गेल्या शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी १५ हजार ७३० तिकिटे आणि ११ हजार ४०० अधिक पासची विक्री झाली. पश्चिम रेल्वेवर पहिल्याच दिवशी चार लाखांहून अधिक प्रवासी वाढले. सोमवारी १३ लाख ९२ हजार १५४ प्रवासी नोंदवण्यात आले. गेल्या आठवड्यातील शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी ९८ हजारांहून अधिक तिकीट विक्री झाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या