लोकलच्या फेऱ्यांच्या वेळेत कोणताही बदल नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा पुन्हा एकदा सुरू झाली. शिवाय, १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्यात आली असून, निश्चित वेळेत सर्वसामान्यांना प्रवास करावा लागतो आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं राज्य सरकार व रेल्वे प्रशासनानं गर्दीचं विभाजन करून लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दिवसेंदिवस लोकलमधील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळं प्रवास वेळ वाढविण्याचं आवाहन केले जात आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रवासी वेळ वाढवणार नसल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. तसंच, सर्वसामान्यांसाठी लोकलची प्रवास वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. त्यानुसार पहाटे पहिली लोकल ते सकाळी ७ वाजेपर्यंत, दुपारी १२ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ७ ते रात्री शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकलच्या प्रवासी संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. दररोज सुमारे ३.८ दशलक्ष प्रवासी प्रवास करत आहेत. मध्य रेल्वे मार्गावर २.१ दशलक्ष आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १.७ दशलक्ष प्रवासी प्रवास करत आहेत.

त्याचप्रमाण, प्रवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेली लोकल बंद करण्यात येणार नाही. शिवाय रेल्वे प्रवाशांना प्रवासावेळी मास्कचा वापर करणं व सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक केलं असतानाही अनेक तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे येत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या