1 सप्टेंबरपर्यंत अॅप-आधारित टॅक्सी कंपन्यांनी नोंदणी करावी

महाराष्ट्र सरकारने राज्यात कार्यरत असलेल्या सर्व अॅप-आधारित प्रवासी वाहतूक ॲग्रिगेटर कंपन्यांना Aggregator Policy 2026 अंतर्गत 1 सप्टेंबर 2026 पर्यंत अनिवार्य नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या मुदतीनंतर नोंदणी न करता सेवा देणाऱ्या किंवा धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सरकारने दिला आहे.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, अॅप-आधारित प्रवासी वाहतूक सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि नियमबद्ध करण्यासाठी सरकार हे धोरण प्रभावीपणे राबवणार आहे. तसेच सर्व ॲग्रिगेटर कंपन्यांनी कायद्याचे पालन करणे बंधनकारक असेल.

महाराष्ट्रात अॅप-आधारित टॅक्सी सेवांचा वापर झपाट्याने वाढत असून, दररोज लाखो प्रवासी या सेवांवर अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने हे धोरण लागू केले आहे.

Aggregator Policy 2026 चे प्रमुख उद्देश

  • सर्व अॅप-आधारित वाहतूक कंपन्यांची अनिवार्य नोंदणी

  • प्रवाशांच्या सुरक्षिततेला अधिक बळकटी

  • वाहनांची कायदेशीर पडताळणी सुनिश्चित करणे

  • चालक पात्रतेची (Eligibility) तपासणी

  • ॲग्रिगेटर कंपन्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करणे

  • वाहतूक सेवांमध्ये अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करणे

सरकारने स्पष्ट केले आहे की, १ सप्टेंबर २०२६ नंतर नोंदणी नसलेल्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.


पुढील बातमी
इतर बातम्या