मुंबई मेट्रो लाईन ७चे लोकार्पण लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA)ला लिहिलेल्या पत्रात मेट्रो रेल्वे सुरक्षाचे आयुक्त आरके शर्मा यांनी मुंबई मेट्रो लाईन ७ च्या सुरक्षेसंदर्भात काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे याचा ट्रेनवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.
CMRS नं १९ आणि २० फेब्रुवारी रोजी मेट्रो लाइन ७ (मुंबई मेट्रो लाइन 7) स्थानकांची तपासणी केली आणि त्यांना आढळले की कोणत्याही मेट्रो स्टेशनवर बॅगेज स्कॅनरसारखी सार्वजनिक सुरक्षा नव्हती.
आपत्कालीन स्थितीत प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मार्ग नव्हता. सर्व मेट्रो स्थानकांवर एस्केलेटर पिट स्प्रिंकलर व्यवस्थेची सुरक्षा कामे प्रलंबित आहेत. कोणत्याही मेट्रो स्टेशनवर स्टेशन रिकामी करण्याच्या योजना नाहीत. मेट्रो स्थानकांवरही सार्वजनिक सूचना फलक नाहीत.
पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पूर्वेकडील प्रवाशांसाठी कोणतीही कनेक्टिव्हिटी नसल्यानं पश्चिमेकडील मेट्रोचा वापर मर्यादित होऊ शकतो, असं CMRSचं मत आहे. स्टेशन आवारात अग्निशमन, पोलिस किंवा रुग्णालयात प्रवेशासाठी डिझाइनमध्ये केलेला नाही.
दृष्टिहीनांसाठी कोणत्याही स्थानकावर विशेष मार्ग बनवण्यात आलेला नाही. याशिवाय दिव्यांगांसाठीच्या स्वच्छतागृहांमध्ये अत्यावश्यक सुविधाही अपूर्ण आहेत.
सर्वच स्थानकांवर रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तरतूद प्रलंबित आहे. तसंच अग्निशमन दलासाठी जागा निश्चित करण्यात आली नव्हती.
स्थानकांची 'ही' कामं अद्याप बाकी
मेट्रो रेल्वे सुरक्षा मंडळानं आता एमएमआरडीएला ही कामं लवकरात लवकर करण्यास सांगितलं आहे. यानंतरच तपासणीची दुसरी तारीख निश्चित केली जाईल.
हेही वाचा