माथेरानची मिनी ट्रेन सुसाट, ८ दिवसांत ५ लाखांची कमाई

माथेरानच्या मिनी ट्रेनचा स्पीड भलेही कमी असेल, पण तिने कमाईच्या बाबतीत अवघ्या आठडाभरात सुसाट कामगिरी केली आहे. मोठ्या गॅपनंतर ३१ ऑक्टोबरला 'माथेरानची राणी' अशी ओळख असलेली 'मिनी ट्रेन' ट्रॅकवर अवतरली. माथेरान ते अमन लॉड्ज आणि अमन लॉज ते माथेरान अशी ही मिनी ट्रेन पुन्हा सुरू करण्यात आली.

पहिल्याच दिवशी ६४ हजारांचा नफा

त्यानुसार फक्त एका आठवड्यात या मिनी ट्रेनने ५ लाख १ हजार ७८० रुपयांची कमाई केली आहे. तर, ज्या दिवशी मिनी ट्रेनने पहिली धाव घेतली, त्या दिवशी एकूण ६४,३०० रुपयांचा नफा मिळवला.

१७ महिन्यानंतर ट्रॅकवर

तब्बल १७ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर माथेरानची राणी ट्रॅकवर परतली आहे. या मिनी ट्रेनचा सर्वात जास्त फायदा माथेरानमध्ये येणाऱ्या वृद्ध, महिला आणि लहान मुलांना होत आहे. शिवाय, पर्यटकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे.

नेरळ ते माथेरान सेवा हवी

मिनी ट्रेनची सेवा अमन लॉज ते माथेरानपर्यंत मर्यादित न ठेवता नेरळ ते माथेरान अशी सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. पण, सध्या या ट्रॅकच्या दुरूस्तीचं काम सुरू आहे. ट्रॅक बांधताना असंख्य अडचणी येत असल्याने या मार्गावर मिनी ट्रेन सुरू केली जात नसल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या