माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल

हिवाळ्यात थंडीचा आनंद लुटण्यासाठी माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खूशखबर आहे. मध्यरेल्वेतर्फे पावसाळ्यात थांबवण्यात येणारी माथेरानची मिनी ट्रेन शुक्रवारपासून पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झाली आहे. सहा डब्यांपुरती मर्यादीत असलेली ही ट्रेन आता ८ डब्यांची होणार आहे.

१६ फेऱ्यांची वाढ

पावसाळ्यानंतर पुन्हा चालू करण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये १६ फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. यामध्ये नेरळ ते माथेरान ३ फेऱ्या चालवण्यात येणार असून अमन लॉज ते माथेरानदरम्यान १४ फेऱ्या चालवण्यात येतील. मंगळवारपासून गुरुवारपर्यंत नेरळ ते माथेरान २ फेऱ्या चालवण्यात येणार असून अमन लॉज ते माथेरान १२ फेऱ्या चालवण्यात येतील.

अमन लॉज ते माथेरानपर्यंत २२ फेऱ्या

शुक्रवारी फेऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन २१ फेऱ्या होतील. यामध्ये ३ फेऱ्या नेरळ ते माथेरान आणि बाकीच्या फेऱ्या अमन लॉज ते माथेरानपर्यंत चालवण्यात येईल. विकेंडला म्हणजे शनिवार आणि रविवारी एकूण २२ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये दोन फेऱ्या नेरळ ते माथेरानपर्यंत आणि उर्वरित २२ फेऱ्या अमन लॉज ते माथेरानपर्यंत चालवण्यात येतील.

पुढील बातमी
इतर बातम्या