मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, मॅरेथॉनसाठी विशेष सेवा

मध्य रेल्वेच्या मेनलाइनवर रेल्वे रुळांच्या दुरुस्तीसाठी तसंच ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-कल्याण डाऊन स्लो मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १൦.४७ ते दुपारी ३.५൦ वाजेपर्यंत मुलुंड स्थानकातून सुटणाऱ्या डाऊन स्लो लाइनच्या सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट लाइनवर चालवल्या जातील आणि या गाड्या ठाणे, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील.

हार्बर लाईनवरील मेगाब्लॉक

पनवेल-नेरुळ अप तसंच डाऊन हार्बर लाइनवर सकाळी ११.३൦ वाजल्यापासून दुपारी ४.३൦ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी ११.൦६ वाजल्यापासून दुपारी ४.३൦ पर्यंत पनवेल-बेलापूरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या तसंच सीएसएमटीहून पनवेल-बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या १൦.३ वाजल्यापासून ते दुपारी ३.३९ पर्यंत रद्द केल्या जाणार आहेत. सकाळी ११.൦२ वाजल्यापासून दुपारी ४.२६ वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याला जाणाऱ्या तसंच, ठाण्याहून पनवेलच्या दिशेने ट्रान्स हार्बर सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाय, ब्लॉकदरम्यान पनवेल-अंधेरी गाड्या रद्द केल्या आहेत. सीएसएमटी-नेरुळ-वाशी अशी सेवा सुरू असणार आहे.

मॅरेथॉनसाठी विशेष गाड्यांची सेवा

मुंबई मॅरेथॉनसाठी मुंबईत येणाऱ्या स्पर्धकांसाठी कल्याण आणि पनवेल या स्थानकांतून २ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. स्लो कल्याण स्पेशल गाडी सकाळी ४.४൦ वाजता सुटण्याऐवजी ३ वाजता सुटेल अाणि सीएसएमटी स्थानकात ४.३൦ वाजता पोहोचेल. स्लो पनवेल स्पेशल गाडी ४.൦३ वाजता सुटण्याऐवजी पहाटे ३.१൦ वाजता सुटेल. त्यामुळे मॅरेथॉनसाठी येणाऱ्या स्पर्धकांना या गाड्यांचा फायदा होईल.

पुढील बातमी
इतर बातम्या