मेट्रो स्थानकांच्या बाहेरही उपलब्ध होणार सायकल सेवा?

(Representational Image)
(Representational Image)

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) दहिसर आणि अंधेरी दरम्यानच्या आगामी दोन मेट्रो कॉरिडॉरच्या मेट्रो स्टेशनच्या बाहेरून प्रवाशांना सायकल भाड्यानं देण्याची सुविधा देण्याचा विचार करत आहेत.

वर्सोवा-घाटकोपर मेट्रो १ मार्गावर यापूर्वीच ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. MMRDA दहिसर आणि डहाणूकरवाडी इथून मेट्रो २A कॉरिडॉर तसंच दहिसर पूर्व आणि आरे कॉलनी इथून मेट्रो-७ कॉरिडॉर मेच्या मध्यापर्यंत अंक्षत: उघडेल. संपूर्ण कॉरिडॉर ऑक्टोबर २०२२ पासून कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

MMRDA अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, ते भाड्यानं सायकली देणाऱ्या कंपन्यांशी चर्चा करत आहेत. त्यासोबतच प्रत्येक मेट्रो स्टेशनच्या बाहेर एक जागा शोधत आहेत. या योजनेमुळे प्रवाशांना शेवटच्या टप्प्यापर्यंत कनेक्टिव्हिटी मिळेल आणि दोन वर्षांपूर्वीच्या सध्याच्या मेट्रो कॉरिडॉर प्रमाणेच हा प्रयोग आहे.

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी मेट्रो २A आणि मेट्रो ७ च्या ट्रायल चालू असतानाची माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, सुरक्षा प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर ते प्रवाशांसाठी सेवा सुरू करतील. सुरक्षा प्रमाणपत्र मार्चच्या अखेरीस येईल आणि त्यानंतर पुढील महिन्यात दोन मेट्रो स्थानके सुरू करू शकतो.

दुसरीकडे, एमएमआरडीएनं बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट)ला फीडर सेवा म्हणून नवीन बस सेवा चालवण्याची विनंती केली आहे.


हेही वाचा

मध्य रेल्वे 'आरपीएफ'च्या गस्ती पथकाच्या ताफ्यात ९ वाहने दाखल

प्रवासी वाढविण्यासाठी मोनो रेलचे महालक्ष्मीपर्यंत विस्तारीकरण

पुढील बातमी
इतर बातम्या