मोनो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

मुंबई - वडाळा ते लोअर परळ दरम्यान सुरू होणारी मोनो लवकरच धावताना दिसणार आहे. वडाळा डेपो ते लोअर परळ दरम्यान मोनोची 9 किमीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. वडाळा डेपो, जीटीबी नगर, अँन्टॉप हिल, आचार्य अत्रे नगर, वडाळा ब्रिज, दादर पूर्व, नायगाव, आंबेडकर नगर, मिंट कॉलनी, लोअर परेल या स्थानकांवर ही चाचणी घेण्यात आली. ताशी 15 किमी प्रतितास वेगाने ही चाचणी घेण्यात आली. मोनोचं अंतीम स्थानक संत गाडगे महाराज स्थानक हे लोअर परळ स्टेशनपासून 1200 मीटर अंतरावर आहे. त्यामुळे लवकरच मोनो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होणार आहे. 

 

पुढील बातमी
इतर बातम्या