एसटी मुख्यालयातही कोरोनाचा शिरकाव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. अशातच आता या कोरोनानं मुंबईतील एसटी मुख्यालयातही शिरकाव केला आहे. राज्यभरात ३४८ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून, ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांपैकी ४ कर्मचारी हे एसटीच्या मुख्यालयातील आहेत. मृत कर्मचाऱ्यांचे वारस किंवा कुटुंबीयांना ५० लाख रुपयांच्या मदतीची घोषणा एसटी महामंडळाने केली होती. मात्र, अद्याप एकाही मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ही मदत मिळालेली नाही.

५० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यावरून एसटीत गोंधळाची स्थिती असून चालक, वाहक, सुरक्षारक्षकांशिवाय अन्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा उल्लेख नाही. त्यामुळे अन्य कर्मचारी मदतीपासून वंचित राहणार आहेत.

एसटी महामंडळाने अद्यापही परिपत्रकात बदल केले नाहीत. फक्त चालक, वाहक तसेच वाहतूक निरीक्षक, सुरक्षारक्षकांचा उल्लेख असून यात बदल करून कोरोनाकाळात कर्तव्यावर असलेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचा उल्लेख केला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली

पुढील बातमी
इतर बातम्या