एसटी कर्मचारी संप; महामंडळाचं 'इतक्या' कोटींच नुकसान

विलगीकरणाच्या मागणीसाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी गेल्या २ महिन्यांहून अधिक काळ संपावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळं एसटी महामंडळाला मोठा फटका बसला आहे. एसटी महामंडळाला १२०० कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती माहिती समोर येत आहे.

कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे एसटीची वाहतूक बंद असल्यानं सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात आले आहे.

या आवाहनाला न जुमानता संपात सहभागी झालेल्यांवर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत २ हजारांहून अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवासमाप्ती करण्यात आली असून, ३१२३ कर्मचारी बडतर्फ करण्यात आल्याचं समजतं.

या संपामुळे एसटी महामंडळाला १२०० कोटींचा तोटा झाला आहे. दररोज ३०० ते ४०० कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. कामगारांमधील सकारात्मक बदलामुळे कामावर रुजू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यभरातील २५० आगारांपैकी २१५ आगारांतून वाहतूक सुरू झाली आहे. कर्तव्यावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या