गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शिवशाही बसच्या संख्येत वाढ

कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा (mumbai local) बंद असल्यानं प्रवाशांना आपला खिशाला कात्री लावून प्रवास करावा लागत आहे. त्याशिवाय प्रवाशांची गर्दीही प्रचंड वाढली आहे. त्यामुळं या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सोमवारपासून शिवशाही बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. 

कल्याण (kalyan), ठाणे (thane) ते मंत्रालय (mantralaya) मार्गावर बसने प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाची गर्दी पाहत सोमवारपासून वातानुकुलित शिवशाही (ac shivsahi) बसगाडया चालवण्याचा निर्णय एसटी महामंडळानं (msrtc) घेतला आहे. गर्दीच्या वेळी या शिवशाही बसमधून सरकारी, खासगी कार्यालयीन बरोबरच सर्वाना  प्रवास करता येणार आहे.

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील लोकल सुरु आहेत. तर खासगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह अन्य प्रवाशांसाठी लोकल सेवा नाही. त्यामुळे मुंबई महानगरातील पालिका परिवहन सेवा, एसटीवर मोठा ताण पडत आहे. त्यामुळं वाढणारी गर्दी लक्षात घेता प्रवास सुकर करण्यासाठी मुंबई महानगरात धावणाऱ्या एसटीच्या साध्या बसगाड्यांच्या संख्येत टप्प्याटप्यात वाढ केली जात आहे. 

एसटी महामंडळानं प्रथमच वसई, विरार, नालासोपारा, डोंबिवली, ठाणे येथून मंत्रालयपर्यंत वातानुकू लित शिवशाही बसही चालवण्यास सुरुवात केली. सध्या २३ शिवशाही बस धावत असतानाच आता आणखी ६ शिवशाही बसचा समावेश केला जात आहे. यात कल्याण ते मंत्रालय ते कल्याण या नविन मार्गावर ४, तर ठाणे ते मंत्रालय ते ठाणे या मार्गावर आणखी २ शिवशाही सोमवारपासून चालवण्यात येत आहे.

सध्या ठाणे ते मंत्रालय ते ठाणे २ शिवशाही बस धावत आहेत. सध्या सुरु असलेल्या शिवशाही बसगाड्यांना ७५ टक्केपर्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्यानेच कल्याणचा मार्गही निवडण्यात आल्याचं समजतं.

कल्याण ते मंत्रालय ४ गाड्यांच्या दिवसभरात १६ फेऱ्या

  • सकाळी ८ वाजता, त्यानंतर ८.३० वा., ९ वा. आणि ९.३० वा. मंत्रालयासाठी गाड्या सुटतील. 
  • कल्याणसाठी संध्याकाळी ४.४५ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६.१५ पर्यंत दर अर्ध्या तासांनी गाड्या सुटतील. दुपारीही शिवशाही सेवा असेल. 
  • ठाणे ते मंत्रालय ते ठाणे मार्गावर सध्या २ बसच्या ८ फेऱ्या होत आहेत. आता ठाणे मार्गावर सोमवारपासून आणखी २ बसच्याही आठ फे ऱ्या होतील.
  • सोमवारपासून सकाळी ९ आणि ९.३० वाजता ठाणे ते मंत्रालय आणि संध्याकाळी मंत्रालय ते ठाणेसाठी संध्याकाळी ५.३० आणि ६ वाजता सुटणार आहे. 
  • दुपारीही ४ फेऱ्या होणार आहेत.
पुढील बातमी
इतर बातम्या