ग्रँट रोड येथील फ्रेरे पूल वाहतुकीसाठी खुला

(Image: Twitter/BEST)
(Image: Twitter/BEST)

दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड येथील फ्रेरे पूल दुरुस्तीनंतर वाहतुकीसाठी अधिकृतपणे बुधवारी खुला करण्यात आला. आयआयटी पूल तपासणीत धोकादायक ठरवण्यात आला होता. मात्र या पुलाच्या पुर्नबांधकामानंतरही हा पूल वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिकांची होणारी गैरसोय कमी करण्यासाठी मंगळवारी या पुलावरून वाहतूक सुरू केली होती. रेल्वे रुळांवरील पूल असल्यानं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्हिडीओच्या माध्यमाने पुलाचे लोकार्पण करण्याची औपचारिकता पार पाडली.

ग्रँट रोड इथं सन १९२१मध्ये फ्रेरे पुलाची उभारणी करण्यात आली. तब्बल १०० वर्षांनी या पुलाची दुरुस्ती करण्यात आली आहे. या पुलामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. सप्टेंबर २०१९मध्ये आयआयटी पूल तपासणीत या पुलातील गर्डरची दुरुस्ती करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार जानेवारी २०२०मध्ये काम हाती घेण्यात आले. या पुलाच्या दुरुस्तीसाठी १८.६५ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती मिळते.

नवीन पुलाची लांबी १७.५० मीटर आहे. जुन्या पुलाची लांबी १६.७८ मीटर इतकी होती. तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुलावर पदपथ निर्माण करण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या