मध्य रेल्वे शुक्रवारी आपल्या 12 एसी गाड्या नॉन-एसी गाड्या म्हणून चालवणार असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाने (DRM) दिली आहे. एसी ट्रेनचे तिकीट/पास असलेल्या प्रवाशांना नॉन-एसी ट्रेनमधून प्रवास करावा लागेल. मध्य रेल्वेवरील (CR) एसी ट्रेन सेवा शनिवारपर्यंत पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.
DRM मुंबईने त्यांच्या अधिकृत ट्वविटवर प्रवाशांना माहिती दिली की, काही तांत्रिक समस्यांमुळे AC ट्रेन आज (13 सप्टेंबर) नॉन-एसी म्हणून धावतील. CR ने खाली दिलेल्या ट्रेनच्या वेळा देखील दिल्या आहेत.
शुक्रवारी एसी ट्रेन सेवांना कोणत्या तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे विचारले असता, मध्य रेल्वेचे प्रवक्ते पीडी पाटील म्हणाले की, त्यांना तांत्रिक अडचणींबद्दल माहिती नाही आणि तपास करत आहोत.
बुधवारी, 11 सप्टेंबर रोजीही गीतांजली एक्स्प्रेसमध्ये झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला. ट्रेनला टिटवाळा स्थानकावर पहाटे अनपेक्षित थांबा लागला, त्यामुळे सकाळी गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत होती.
हेही वाचा