24 डब्यांची एक्स्प्रेस डिसेंबरपासून सीएसएमटीहून धावणार

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सध्या 13 ते 17 डब्यांच्या एक्स्प्रेस गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10, 11, 12 आणि 13 वर थांबवल्या जाऊ शकतात. मात्र, आता या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले असून सीएसएमटीवरून 1 डिसेंबरपासून 24 डब्यांची एक्स्प्रेस धावेल, असा विश्वास मध्य रेल्वेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

CSMT वर एकूण 18 प्लॅटफॉर्म असून त्यापैकी 7 प्लॅटफॉर्म लोकलसाठी आणि 11 प्लॅटफॉर्म लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी आहेत. या 11 प्लॅटफॉर्मपैकी 10, 11, 12 आणि 13 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर त्यांची लांबी कमी असल्यामुळे 24 डब्यांची एक्स्प्रेसाठी पुरेशी प्लॅटफॉर्म नाही.

13 डब्यांची एक्स्प्रेस आणि 17 डब्यांची एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 आणि 17 डब्यांची एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13 वर थांबू शकते. त्यामुळे या चार प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

हे काम पूर्ण झाल्यानंतर या सर्व प्लॅटफॉर्मवर २४ डब्यांच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळेल. यासोबतच मध्य रेल्वेवरून कोकण, दक्षिण आणि उत्तर भारतात जाणाऱ्या एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संख्येतही वाढ होणार आहे. त्यामुळे अधिक प्रवाशांची वहन क्षमता सामावून घेता येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सीएसएमटी येथून दररोज ९० लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. चार फलाटांचा विस्तार पूर्ण झाल्यास अन्य टर्मिनसवर एक्स्प्रेस गाड्यांची ये-जा करणे सोयीचे होईल. तसेच मध्य रेल्वेला मुंबई ते पुण्यापर्यंत धावणाऱ्या एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढवणे शक्य होणार आहे.

विस्तार असा असेल

प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 298 मीटर लांबीचे असून ते आता 680 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहेत. तर, फलाट क्रमांक 12 आणि 13 ची लांबी 385 मीटर असून ती 690 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.


हेही वाचा

मुंबई - मेट्रो 2 ए, 7 प्रवाशांना आता विमा संरक्षण मिळणार

पुढील बातमी
इतर बातम्या