दिल्ली-मुंबई थेट कनेक्शन, नवीन एक्स्प्रेस वे लवकरच!

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • परिवहन

देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या नवीन एक्स्प्रेस वेची बांधणी लवकरच केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. दिल्लीत झालेल्या एका खासगी कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

खर्च किती?

नवी दिल्ली आणि मुंबई एक्स्प्रेस वे हा ग्रीनफील्ड मार्ग असेल, अशी माहिती गडकरी यांनी यापूर्वीच दिली होती. महामार्गांच्या विस्तारीकरणाऐवजी नवीन रस्ते बांधण्यावर सरकारचा भर असून या प्रकल्पासाठी एक लाख कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

याशिवाय चंबळ एक्स्प्रेस वे बांधण्याचीही योजना आहे. आणि या मार्गाचा फायदा मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना होणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं. 

'ही' समस्या सुटणार

दररोज तब्बल ४० हजार व्यावसायिक वाहने दिल्लीत प्रवेश करतात. त्यामुळे प्रदूषण आणि वाहतूककोंडीत वाढ होत आहे.  ही समस्या सोडवण्यासाठी तब्बल ३५,६०० कोटी रुपयांचे १० प्रकल्प आखण्यात आले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या