मुंबईतल्या 'या' सहा स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर गगनाला भिडले

दिवाळीनिमित्त रेल्वे गाड्याना आणि रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी आहे. रेल्वे स्थानकातील गर्दी नियंत्रणासाठी फलाट तिकीट दरात पाच पट वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे १० रुपयांच्या फलाट तिकिटासाठी आता ५० रुपये मोजावे लागणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, दादर, कल्याण आणि पनवेल या सहा स्थानकात हे फलाट तिकीट दर लागू असणार आहेत. नवीन दर शनिवार, २२ ऑक्टोबरपासून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी आहेत.

गर्दी नियोजनासाठी तात्पुरते उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी शुक्रवारी रात्री उशिरा दिली.


हेही वाचा

आधी प्रवास करा मग तिकिटाचे पैसे भरा : IRCTC

पुढील बातमी
इतर बातम्या