Mumbai Rains : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण माहिती

मुंबईत पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ला स्टेशन परिसरात पाणी साचलं होतं. कुर्ला स्टेशन परिसरात पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवा काही वेळेसाठी विस्कळीत झाली होती. आता मध्ये रेल्वेने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, सर्व मार्गावरील वाहतूक सेवा सुरळीत झाली आहे. 

हार्बर लाइन वडाळा ते मानखुर्द लोकल वाहतूकही पावसामुळे बंद करण्यात आली होती. फक्त डाऊन हार्बर सीएसटी ते वडाळा लोकल सुरू होती. तसेच, डाऊन हार्बर मानखुर्द ते पनवेल लोकल सेवा सुरू आहे. आता सर्व मार्गावरील रेल्वे सेवा सुरू झाली आहे.

दुपारी २.४५ वाजता रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रुळ साफ करण्याचे आदेश दिले. त्यामुळे डाउन हार्बर मार्गावरील मानखुर्द ते वडाळा दरम्यानची लोकल सेवा दुपारी ३.१० वाजता पुन्हा सुरू झाली.

मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने या घटनेमुळे हार्बर मार्गावरील गाड्या वेळेपेक्षा 30 मिनिटे उशिरा धावत असल्याचे मान्य केले. 

मध्य रेल्वेने ट्वीट करत सांगितलं आहे की, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 5 वाजेपासून सुरळीत सुरु झाल्या आहेत. डाऊन हार्बर सीएसटी ते वडाळा लोकल सुरू आहे. तसेच, डाऊन हार्बर मानखुर्द ते पनवेल लोकल सेवा सुरू आहे. दरम्यान, पावसामुळे मध्य रेल्वेवरही परिणाम झाला असून मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवाही सुरू आहे.

दरम्यान, पश्चिम मार्गावर, काही प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, धीम्या मार्गावरील काही गाड्यांना सकाळच्या गर्दीच्या वेळी थोडा विलंब झाला असला तरी, लोकल ट्रेनचे कामकाज सामान्य असल्याचे नोंदवले गेले.

पुढील काही तासांत मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. मुंबईत पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह राज्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस कोसळत आहे. 

आता हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार तास मुंबईकरांसाठी धोक्याचे असल्याचं समोर येत आहे. पुढील काही तासांत आणखी जोरदार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.


हेही वाचा

मुंबई आणि उपनगरात पुढचे काही तास मुसळधार पाऊस

गुड न्यूज! नवी मुंबई विमानतळ 2024 मध्ये सुरू होईल : देवेंद्र फडणवीस

पुढील बातमी
इतर बातम्या