Coronavirus Updates: लोकल ट्रेन ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं रेल्वे बंद करण्याचा सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे. रविवार मध्यरात्रीपासून देशात एकही रेल्वे धावणार नाही. ३१ मार्चपर्यंत रेल्वेने होणारी देशातील प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय रेल्वे खात्यानं घेतला आहे.

मुंबईतील लोकलसेवाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत ३१ मार्चपर्यंत एकही लोकल धावणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी वारंवार गर्दी करू नका अस सांगितले होत, मात्र प्रवाशी सतत गर्दी करत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या पत्रकानुसार, करोना व्हायरस रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रविवारी मंध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत देशातील सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्यात येत आहे.

सर्व प्रकारच्या मेल/एक्स्प्रेस आणि इंटरसिटी ट्रेन्स (प्रिमियम ट्रेन्ससह) आणि सर्व पॅसेंजर ट्रेन्स ह्या ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबईच्या अनेक रहिवाशांनी या निर्णयाचं स्वागत केल आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या