Mumbai local train update: मध्यरेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, प्रवासी ताटकळत

file photo
file photo

अंबरनाथहून (Ambarnath) कर्जतकडे (Karjat) जाणारी लोललसेवा (Mumbai Local) ठप्प झाली होती. अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान कर्जत लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं लोकल सेवा ठप्प झाली होती. तब्बल दीड तासापासून कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली होती. अखेर रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दूर करुन रेल्वेची सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

ऐन गर्दीच्या वेळी अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यान तांत्रिक अडचणीमुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झाला होता. एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं ही लोकल बंद पडली होती. रेल्वेच्या एक तासाच्या प्रयत्नानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झाली. मात्र मध्य रेल्वेचा वेळापत्रक कोलमडलेलं आहे.

रेल्वेनं तात्काळ दुरुस्त करून ही लोकल पुढे पाठवली. मात्र या तांत्रिक अडचणींमुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे. सीएसएमटी आणि कर्जतकडे जाणाऱ्या काही लोकल या तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बदलापूर स्थानकावर सध्या लोकलची वाट बघत प्रवासी ताटकळत उभे आहेत. आता हे वेळापत्रक रुळावर येण्यासाठी किती वेळ लागेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, "S-3 सीएसएमटी-कर्जत लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. कर्मचाऱ्यांनी तात्काळ दुरुस्ती करत तांत्रिक बिघाड दूर केला आहे. त्यानंतर सकाळी 7.50 वाजता रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.

यापूर्वी, शिवाजी सुतार यांनी तांत्रिक बिघाडासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली होती. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, "डाऊन मार्गावर अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान S-3 सीएसएमटी-कर्जत लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अंबरनाथ-कर्जत सेक्शनवरील लोकल सेवा विलंबानं सुरू आहे. रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत."


हेही वाचा

मुंबईतल्या 'या' सहा स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर गगनाला भिडले

आधी प्रवास करा मग तिकिटाचे पैसे भरा : IRCTC

पुढील बातमी
इतर बातम्या