बुधवारी (15 मे 2024) सायंकाळी घाटकोपर परिसरात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. रोड शोमुळे मेट्रो सेवा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो सेवा पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये एक प्रमुख कनेक्टिव्हिटी प्रदान करते. दररोज तीन लाखांहून अधिक प्रवासी मेट्रो सेवा वापरतात.
सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील जागृती नगर आणि घाटकोपर स्थानकांदरम्यान बुधवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबई मेट्रो सेवा बंद राहील. मात्र, जागृती नगर ते वर्सोव्याच्या दिशेने मेट्रो सेवा उपलब्ध असेल. मुंबई मेट्रो वनच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रवाशांनी त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे.
मुंबई मेट्रो 1 सेवा जागृती नगर आणि घाटकोपर मेट्रो स्थानकांदरम्यान, आज, 15 मे रोजी संध्याकाळी 6:00 वाजल्यापासून सुरक्षेच्या कारणास्तव पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहील.