व्हीआयपी क्रमांकामुळे मुंबई आरटीओला ६ कोटींचा नफा

वाहनधारकांमध्ये व्हीआयपी क्रमांक मिळवण्याची भलतीच क्रेझ असते. कोणी आपला लकी नंबर तर कोणी जन्म तारीख असलेला गाडीचा नंबर प्लेट मिळवण्यासाठी उत्सुक असतो. त्यासाठी वाहनधारक कितीही पैसे मोजायला तयार असतात. आणि याच व्हीआयपी क्रमांकामुळे राज्यातील आरटीओला चांगलाच नफा झाला आहे.

राज्याला ७७ कोटी, मुंबईला ६ कोटींचा नफा

व्हीआयपी क्रमांकामुळ राज्यातील आरटीओच्या तिजोरीत गेल्या ८ महिन्यांत ७७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये मुंबईला ६ कोटी ८ लाख रुपयांचा नफा झाला आहे.

६ हजार ६५२ व्हीआयपी क्रमांकाची नोंद

मुंबईतील ताडदेव, वडाळा, बोरिवली आणि अंधेरी आरटीओ विभागात गेल्या ८ महिन्यांत एकूण ६ हजार ६५२ व्हीआयपी क्रमांकाची नोंदणी करण्यात आली.

ठाणेने कमवले ९ कोटी ९८ लाख

ठाणे आरटीओ विभागात १० हजार ७४४ व्हीआयपी क्रमांकाची नोंद झाली असून ९ कोटी ९८ लाखांची कमाई केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या