रविवारी बोरीवली ते नायगांवपर्यंत जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी रविवारी 22 ऑक्टोबर रोजी बोरीवली ते नायगांवपर्यंत जम्बोब्लॉक असणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर हा जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे.

जम्बोब्लॉकच्या दरम्यान रविवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेच्यादरम्यान वसई-विरारहून बोरीवली स्थानकादरम्यान अप मार्गावरील सर्व जलद गाड्या अप धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील. तर बोरीवलीहून वसई-विरारपर्यंत सर्व जलद मार्गावरून चालवल्या जाणाऱ्या गाड्या डाऊन धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील.

पुढील बातमी
इतर बातम्या