१ जानेवारीपासून पश्चिम मार्गावर एसी लोकल

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर १ जानेवारीपासून वातानुकूलीत लोकल धावेल, अशी घोषणा करत मुंबईकर प्रवाशांना नववर्षाची भेट देऊ केलीय. लोकलच्या गर्दीत घामाघूम होऊन दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मेट्रो-मोनोप्रमाणे गारेगार प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

फर्स्ट क्लासच्या दीडपट तिकीट?

वातानुकूलीत लोकलचं तिकीट दिल्ली मेट्रोच्या तिकीट दराएवढं किंवा सध्याच्या लोकलच्या फर्स्ट क्लास तिकिटाच्या दीडपट असण्याची शक्यता आहे. १ जानेवारीपासून पश्चिम रेल्वे मार्गावर वातानुकूलीत लोकल सुरू करण्याच्यादृष्टीने या लोकलची चाचणी घेण्यात आल्याचंही गोयल यांनी स्पष्ट केलं.

३५ लाखांहून अधिक प्रवाशांना फायदा

मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकल ट्रेनने दिवसाला ६५ लाखांच्या वर प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी एकट्या पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या दिवसाला ३५ लाख प्रवासी आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या