Coronavirus Updates: बसगाड्यांमधून उभ्यानं प्रवास करू नये, बेस्टचं प्रवाशांना आवाहन

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबईसह राज्यभरातील नागरिक खबरदारी घेत आहेत. नागरिक कोरोनाच्या भीतीनं घराबाहेर न पडणं पसंत केलं असता. आता सार्वजनिक वाहतुकीची (Public Transport) सेवा बेस्टनं प्रवाशांच्या दृष्टीनं मोठी खबरदारी घेतली आहे. बेस्टनं प्रवाशांना बेस्ट बसगाड्यांमधून उभ्यानं प्रवास न करण्याच आवाहन केलं आहे.

मुंबईतील सद्यस्थितीचा विचार करता कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रवाशांनी बेस्ट बसगाड्यांमधून कृपया उभ्यानं प्रवास करू नये, असं आवाहन बेस्ट (BEST) प्रशासनानं केलं आहे. लोकलं, खाजगी बस, एसटी यांसह बेस्टनंही आपल्या ताफ्यातील बस स्वच्छ करत आहे.

बेस्टनं प्रवासी तिकीट दरात कपात केल्यानं बेस्टच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली. परंतु, कोरोना व्हायरसच्या भीतीनं प्रवाशांनी प्रवास टाळला आहे. मात्र, आता आणखी सुरक्षेसाठी बेस्टनं बसगाड्यांमधून उभ्यानं प्रवास करण्यास मनाई केली आहे.


हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईतील 'या' भागांतील दुकानंही बंद

Coronavirus Updates: गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय


पुढील बातमी
इतर बातम्या