नांदेड-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार

नांदेड–मुंबई (mumbai) नियमित विमानसेवा (flights) लवकरच सुरू करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी नांदेड जिल्ह्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाला दिली.

या निर्णयामुळे नांदेडसह (nanded) संपूर्ण मराठवाड्याच्या उद्योग, व्यापार, पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

आमदार हेमंत पाटील, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भीमराव केराम, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंदराव बोढारकर आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नांदेड-मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड विमानतळ सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज आहे. मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्यामुळे सेवा सुरू करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले.

मुंबईतील नव्या विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्लॉट उपलब्ध होतील आणि नांदेड-मुंबई विमानसेवा नियमित सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिष्टमंडळाने दररोज सकाळी नांदेडहून मुंबईकडे आणि रात्री मुंबईहून नांदेडकडे विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली.

या सेवेचा लाभ नांदेडसह लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील नागरिकांनाही होईल, असे त्यांनी नमूद केले.

याचवेळी छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाअंतर्गत नांदेड येथे विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याच्या मागणीकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.

2025 पासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले.


हेही वाचा

वेलंकणी यात्रेकरुंसाठी विशेष रेल्वे धावणार

ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रकल्प : धूळ-आवाज प्रदूषणावर नोटीस

पुढील बातमी
इतर बातम्या