एसटीच्या ताफ्यात लवकरच ७०० बस

एसटी महामंडळात बसगाड्यांची कमतरता पाहता नवीन ७०० बसगाड्या दाखल करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली असून या बसगाड्यांमध्ये १५० विनावातानुकू लित शयनयान व आसन प्रकारातील बसचा समावेश आहे. दिवाळीनंतर या सर्व बस टप्प्याटप्प्यात दाखल होतील. एसटीच्या ताफ्यात १५ हजार ८०० बसगाड्या असून यामध्ये लाल रंगाच्या परिवर्तन बसगाड्याच अधिक आहे.

गेल्या दीड वर्षात नवीन खरेदी न झाल्यामुळे एसटीच्या ताफ्यातील बसची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे नवीन बस दाखल करण्याची प्रक्रि या एसटी महामंडळाकडून के ली जात आहे. सध्या एसटीला आणखी २००० बसची गरज असून प्रथम ७०० नवीन गाड्या घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यात सर्व बस बीएस-६ प्रणालीतील असतील. यामध्ये डिझेल इंजिनावरील ५०० साध्या बस व ५० सीएनजीवरील बस आहेत. शिवाय विनावातानुकू लित शयनयान व आसन प्रकारातील १५० बस घेण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

बीएस ६ प्रणालीच्या नवीन बस सांगाड्याकरिता (चेसिस)निविदा काढली असल्याचे एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ७०० बसची बांधणी एसटी महामंडळाकडून के ली जाणार आहे. निविदा प्रक्रि या पूर्ण होण्यास साधारण तीन महिने जातील. त्यानंतर अन्य प्रक्रि या झाल्यावर बसगाड्यांची बांधणी करून बस ताफ्यात आणल्या जातील. दिवाळीनंतर टप्प्याटप्यात बस येतील, अशी माहिती देण्यात आली.

सध्या एसटीच्या ताफ्यात १५ हजार ८०० बस असून त्यात लाल रंगाच्या परिवर्तन बस, शिवशाही, शिवनेरी, हिरकणी व मानव विकासांतर्गत बसगाड्या आहेत. ताफ्यात विनावातानुकू लित शयनयान बसही असून आणखी शयनयान व आसन प्रकारातील बसही येतील.

एसटीची सध्या दररोजची प्रवासी संख्या १७ लाखांपर्यंत पोहोचली असूून उत्पन्न साडेआठ कोटी रुपयांपर्यंत मिळत आहे. राज्यात मार्च महिन्यात वाढत जाणारे करोना रुग्ण व काही जिल्ह््यांत लागलेले निर्बंध यामुळे प्रवासी संख्या कमी झाली आहे. फे ब्रुवारीत एसटीतून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ३३ लाख होती व उत्पन्न १६ कोटींपर्यंत होते.


हेही वाचा -

भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयाला भीषण आग, २ जणांचा मृत्यू

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त


पुढील बातमी
इतर बातम्या