मध्य रेल्वे मर्गावरील प्रवाशांना दिलासा

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

मुंबई - मध्य रेल्वे मार्गावर दिवसेंदिवस प्रवाशांच्या गर्दीत वाढ होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या मार्गांवर धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. एप्रिल महिन्यापासून नवे वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. वेळापत्रकानुसार एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिव्यातील प्रवाशांसाठी आणखी दहा फास्ट लोकल फेऱ्यांची भेट मिळणार आहे. त्याचप्रमाणे ट्रान्सहार्बर प्रवाशांनाही दहा वाढीव फेऱ्यांचे गिफ्ट मिळणार आहे.

नव्या वेळापत्रकात मेन लाइनवरील कमी अंतरांच्या फेऱ्यांचा विस्तार करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मध्य रेल्वेवर एका दिवसात 1 हजार 658 लोकल फेऱ्या होतात. यापैकी 836 फेऱ्या मध्य रेल्वेवर, तर हार्बरवर 590 आणि ट्रान्सहार्बरवर 232 फेऱ्या होतात. या वेळापत्रकात दिवासाठी आणखी दहा जलद लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यात येईल. त्याचबरोबर ट्रान्स हार्बर प्रवाशांनाही दिलासा देताना 10 वाढीव फेऱ्या मिळतील.

पुढील बातमी
इतर बातम्या