‘पुढील स्थानक ओशिवरा’

  • अर्जुन कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

मुंबई - कित्येक वर्षे रखडलेलं ओशिवरा स्टेशन अखेर 27 नोव्हेंबरला प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील 37वे स्टेशन असणाऱ्या ओशिवरा स्टेशनवर सर्व बोरिवली धिम्या गतीच्या लोकलना थांबा दिला जाईल. स्टेशन उद्घाटन सोहळा झाल्यानंतर काही वेळातच प्रत्यक्ष सेवा चालवली जाईल.

पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव आणि जोगेश्वरीमध्ये आणखी स्टेशन असावे, अशी प्रवाशांकडून मागणी केली जात होती. त्यावर ओशिवरा स्टेशनसाठी परवानगी देण्यात आली. पण, स्टेशन इमारतीसह अनेक कामं पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटनाचा मुहूर्त मिळत नव्हता. अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या स्टेशनचं उद्घाटन केलं जाईल. सीएसटी ते अंधेरीपर्यंतच्या हार्बर सेवेचा गोरेगाव स्टेशनपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी 31 मार्च 2017 पर्यंतची मुदत आहे. हा विस्तार होताना ओशिवरा येथेही या लोकल थांबतील, असं स्पष्ट करण्यात आलंय. एमयूटीपी 1 अंतर्गत ओशिवरा स्टेशन स्थापन करण्याचा प्रस्ताव होता. 2008 मध्ये हे स्टेशन कार्यान्वित होण्याची अपेक्षा होती. पण उड्डाणपुलाच्या अभावामुळे इथल्या रेल्वे फाटकाला पर्याय मिळत नव्हता. त्यातून मार्ग काढताना सर्व यंत्रणेस 2016 उजाडलं.

पुढील बातमी
इतर बातम्या