परळ स्टेशन होणार टर्मिनस

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

परळ - दिवसेंदिवस रेल्वेच्या मध्य मार्गावरील दादर स्थानकात प्रवाशांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता रेल्वेने परळ टर्मिनस बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाची सुरुवात झाली असून फलाटांची पायाभरणी, नवीन पादचारी पुलाचे बांधकाम झाल्यानंतर ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आदी गोष्टींची कामे झाल्यानंतर साधारण ही सेवा सहा ते आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये परळ टर्मिनस प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या मध्य मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता लवकरच सुखकर होणार आहे. टर्मिनससाठी 51 कोटींचा खर्च येणार आहे. मध्य रेल्वेवर सीएसटी ते कुर्लादरम्यान पाचवा-सहावा मार्ग एमयूटीपी-2 अंतर्गत बांधला जाणार आहे. या प्रकल्पातच परळ टर्मिनसही बांधण्यात येणार आहे. या टर्मिनसमधून दादर, सीएसटीप्रमाणेच लोकल सोडण्यात येतील. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून पावसामुळे हे काम रखडले होते. मात्र आता या कामाला गती मिळाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या