रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर, तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जादा वेळ

आयआरसीटीसी या तिकीट बुकिंग अॅप किंवा वेबसाईटवरून तिकीट बुक करताना प्रवाशांना आता 15 मिनिटांचा जादा अवधी मिळणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आयआरसीटीसीने तिकीट बुकिंगच्या प्रक्रियेत बदल केला आहे.

तिकीट बुकिंग रात्री 11.45 पर्यंत 

यापूर्वी आयआरसीटीसीच्या अॅप किंवा वेबसाईटवरून प्रवाशांना रात्री 11.30 वाजेपर्यंतच तिकीट बुकिंग करता येत होतं. मात्र आता रात्री 11.45 पर्यंत प्रवाशांना तिकीट बुक करता येणार आहे.

सर्व्हर इतक्या वेळासाठी बंद 

याआधी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाचा मुख्य सर्व्हर एक तास बंद असायचा. मात्र आता यामध्ये 15 मिनिटांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे हा सर्व्हर 45 मिनिटं बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांना तिकीट बुकिंग करताना 15 मिनिटांचा जादा वेळ मिळणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या