पेटीएम पेमेंट्स बँके(पीपीबी)ने इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटचा झपाट्याने प्रसार व्हावा तसंच प्रवाशांना सुलभतेने फास्टॅग खरेदी करता यावं यासाठी देशभरात ७५० केंद्रे सुरू केली आहेत. प्रत्यक्ष टोल प्लाझावर २५० केंद्रे उभारली असून इतर ५०० केंद्रे मुंबई, पुणे, दिल्ली-एनसीआर, बंगळूर, हैदराबाद, चंदिगड, चेन्नई आणि जयपूर सारख्या २० शहरांमधील कॉर्पोरेट आॅफिस, निवासी सोसायट्या आणि पार्किंग लॉटमध्ये उभारली आहेत.
फास्टॅग हा एक साधा व पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोगा टॅग आहे, जो रेडियो-फ्रिक्वन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीवर चालतो. पेटीएम पेमेंट्स बँकेने नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन योजनेचा चा एक भाग म्हणून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह भागीदारी केली आहे. यामुळे पेटीएम फास्टॅगचा उपयोग करून महामार्गावरील टोलवरून विनाविलंब प्रवास करता येईल.