मस्जिद स्थानकाजवळील पादचारी पुलावर लवकरच हातोडा

मध्य रेल्वे मार्गावरील मस्जिद बंदर स्थानकाजवळील सीएसएमटीच्या दिशेनं असणाऱ्या जुना पादचारी पूल लवकरच पाडण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबरपासून या पुलाच्या पाडकामाला सुरुवात होणार असून या ठिकाणी नवा पूल उभारण्यात येणार आहे.

नवा पूल बांधण्याचा निर्णय

६ डिसेंबरपूर्वी नवीन पुलासाठी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार असून या कामासाठी सीएसएमटी ते भायखळापर्यंत अप आणि डाऊन धीमी लोकल सेवा बंद ठेवण्याचं नियोजन आहे. दरम्यान, गुरुवारी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली. त्यावेळी हा पूल जीर्णावस्थेत आढळून आला आहे. त्यामुळे हा पूल पाडून नवा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी ४५ दिवसांचा कालावधी

मस्जिद रेल्वे स्थानकाजवळील सीएसटीएसच्या दिशेनं जाणाऱ्या पादचारी पुलाच्या पाडकामासाठी आणि त्याठिकाणी नवा पूल उभारण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्याचप्रमाणे मध्यरात्री दोन ते तीन तासांचं ब्लॉक घेण्यात येणार असून पुलाची किरकोळ कामं २६ नोव्हेंबरपासून हाती घेतलं जाणार आहे.

पाच तासांचा ब्लॉक

या कामासाठी पाच तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. यादरम्यान सीएसएमटी स्थानकापासून ते सँड हर्स्ट रोड स्थानकापर्यंत ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. याशिवाय ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते भायखळा स्थानकापर्यंत अप आणि डाऊन मार्गावरील धीमी लोकल सेवा बंद ठेवलं जाणार असून यादरम्यान सीएसएमटीपर्यंत विषेश जलद लोकल चालवण्याचा विचार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या