मुंबईत इंधन दरवाढीचा भडका कायम, पेट्रोल पुन्हा महागलं

सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतरही इंधन दरवाढीचा भडका सुरूच आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. त्याप्रमाणे मुंबईत मंगळवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 23 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 31 पैशांनी वाढ झाली. यामुळे मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लिटर 87.73 आणि डिझेलची किंमत प्रति लिटर 77.68 झाली आहे.

सामान्यांची होरपळ

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सातत्याने होत असल्याने सामान्यांची होरपळ सुरुच आहे. दर कपातीनंतरही मंगळवारी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला. त्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागलं आहे. मुंबईत पेट्रोल 23 पैशांनी आणि डिझेल 31 पैशांनी महागलं आहे.

इंधनाचा भडका सातत्याने सुरू असून याचा मार सर्वसामान्य जनतेला बसत आहे. यावरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठल्यानंतर काही दिवसांपूर्वी केंद्र सरकाने उत्पादन शुल्कात कपात केली. मात्र त्यानंतरही इंधन दरवाढ काही थांबताना दिसत नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या