Corona virus: पोलिसांचे टॅक्सी आणि रिक्षा चालकांना हे आवाहन

नाॅवेल कोरोना नावाचं संकट जगभरात थैमान घालतयं, महाराष्ट्रातही या संसर्गाची बाधा आतापर्यंत ५२ जणांना झाली आहे. मुंबईत नुकताच या आजाराने एका ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीने विमानतळावरून ज्या टॅक्सीतून प्रवास केला. त्या टॅक्सीतून प्रवास केलेल्या ५ जणांना ही कोरोनाची लागण झाली. त्यामुळे स्थानिक पोलिस ठाण्यांकडून परिसरातील टॅक्सी आणि रिक्षा चालकांना खबरदारी म्हणून स्वच्छतेबाबत आवाहन केले आहे. 

हेही वाचाः- Coronavirus : राज्यातील कोरोनाबाधीतांची हाफ सेंच्युरी, ३ नवे रुग्ण आढळले

कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या आता ५२ वर पोहचली आहे. यापैकी मुंबईमध्ये  काही दिवसांपूर्वीच एका ६३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. पोलिस तपासात या रुग्णामुळे अजून ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. घाटकोपर येथे राहणारी हि व्यक्ती दुबईवरून परत येताना विमानतळावरून टॅक्सी करून घरी पोहोचली होती. आणि या टॅक्सी मधून इतर लोकांना कोरोनाचा प्रसार झाल्याचे लक्षात येताच, मुंबई पोलिसांच्या सहार आणि एअर पोलिसांनी युद्ध पातळीवर टॅक्सी चालकाचा आणि त्या टॅक्सीतून दिवसभरात प्रवास केलेल्याचा शोध घेऊन त्यांची वैद्यकिय चाचणी केली. ही टॅक्सी प्रिपेड असल्यामुळे पोलिसांना यातून प्रवास करणाऱ्यांची माहिती वेळेत मिळाली. 

हेही वाचाः-Coronavirus : राज्यातील कोरोनाबाधीतांची हाफ सेंच्युरी, ३ नवे रुग्ण आढळले

या घटनेनंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून टॅक्सी आणि रिक्षा चालकांसोबत बैठक बोलवत आवाहन करण्यास सुरूवात केली आहे.  सहार आणि एअर पोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात ग्राहकाच्या शोधात टॅक्सी आणि रिक्षा चालक येत असतात. पोलिसांनी त्या परिसरातील ८०० टॅक्सी आणि रिक्षा चालकांची बैठक घेऊन त्यांना कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. चालकांना दररोज अंगावरील कपडे बदलण्यास सांगितले आहेत. त्याच बरोबर दिवसातून दोन वेळा टॅक्सी धुण्यास सांगितले आहे. तसेच दर दोन तासांनी टॅक्सीतील प्रवाशांचा वारंवार हात लागणारे हॅडल, तसेच स्वतःचे हात सॅनेटाइझरने स्वच्छ करण्यास सांगितले आहे. तसेच प्रवासा दरम्यान तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या