‘राम मंदिर’ आदर्श स्टेशन बनणार?

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

राम मंदिर - राम मंदिर स्टेशनवर वीर सेनेच्या वतीने रविवारी स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आलं. राम मंदिर स्टेशनला आदर्श स्टेशन बनवण्यासाठी स्टेशनवर झाडाच्या कुंड्या ठेवण्यात आल्या. त्या कुंड्या ठेवण्यासाठी स्टेशनवर योग्य जागा सापडली नसल्याने प्रवाशांच्या बसण्याच्या आसनावर, स्टेशनच्या पायऱ्यांवर त्या ठेवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. मात्र तरीही वीर सेनाच्या वतीने करण्यात आलेल्या या उपक्रमाचं प्रवाशांनी स्वागत केलंय. पण, दोन दिवस झाले तरी या स्टेशनवर कोणीच त्या झाडांना पाणी घालायला आलेलं नाही, त्यामुळे ही झाडं कोमेजून गेली आहेत. त्यामुळे राम मंदिर आदर्श स्टेशन होईल का असा सवाल प्रवासी अजय गुप्ता यांनी केला आहे. तर, वीर सेनेचे अध्यक्ष निरंजन पाल यांनी आपण राम मंदिर स्टेशनला आदर्श स्टेशन करुन दाखवू असा विश्वास व्यक्त केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या