खासगी बसेसकडून प्रवाशांची लूटमार

यंदा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठ खासगी बसेसनं प्रवास करायचा असेल, तर नेहमीच्या तिकीट दरांपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. एसटीनं दिवाळीत १० टक्के भाडेवाढ केली आहे. त्यात, एसटी गाड्यांचं आरक्षित तिकीट मिळत नसल्यानं प्रवाशांना खासगी बसेसनं प्रवास करावा लागतो आहे. मात्र, या खासगी बस आणि लग्झरी सेवांकडून सध्या प्रवाशांची लूटमार सुरू आहे.

खासगी बससेवांच्या दरात वाढ

मुंबई ते गोवा, औरंगाबाद, कोल्हापूर अशा सर्वच मार्गांवर खासगी बससेवांच्या दरात वाढ झाली आहे. तात्पुरत्या कालावधीसाठी खासगी बससेवांना एसटीच्या तिकीट दरांपेक्षा दीडपट अधिक भाडे आकारण्यास मुभा आहे.

मात्र सर्वच मार्गावर हंगाम नसतानाच्या कालावधीत आकारले जाणाऱ्या तिकिटाच्या तुलनेत सध्याचं भाडं दुप्पट झालं आहे. पुढील काही दिवस प्रवाशांना या जादा दरवाढीला सामोरं जावं लागणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या