खासगी वाहतुकीचे तिकीट दर दुप्पटीने

  • सुनील महाडेश्वर & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

मुंबई - दिवाळी तोंडावर आल्यामुळे खासगी वाहतूकदारांनी बसच्या भाड्यामध्ये वाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. हंगामात खासगी बस वाहतुकीतली दरवाढ दुप्पट नसून 10 ते 15 टक्केच असल्याचं एक बसमालक राजेश कासार यांनी सांगितलं. पण, ज्या मार्गावर अंतरापर्यंत 500 ते 600 रुपये आकारले जायचे, तेथे आता 1,100 ते 1,200 रुपये आकारले जात आहेत. म्हणजेच तिकिटासाठी दुपटीने पैसे मोजावे लागणार आहेत, अशी प्रवाशांची तक्रार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर हंगाम नसताना वातानुकूलित शयनयानसाठी 800 रुपये दर खासगी वाहतूकदार आकारतात. मात्र, दिवाळीदरम्यान याच मार्गावर प्रवाशांना सुमारे 1,500 रुपये मोजावे लागतायत. महाबळेश्वरला जाण्यासाठी हंगाम नसताना वातानुकूलित शयनयानसाठी 500 रुपये आणि आता हंगामात 900 ते 1200 रुपये भाडं आकारलं जातंय. दरम्यान, डिझेल दरवाढीमुळे प्रवासी भाड्यात वाढ करावी लागते आहे, असं बसमालक सांगतायत.

पुढील बातमी
इतर बातम्या