दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. मुंबईकरांसाठी लोकल (mumbai local) ट्रेन त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. एक दिवस लोकल सेवेत काही बिघाड झाला, तर त्याचा मोठा परिणाम मुंबईकरांसह त्यांच्या पुढील संपूर्ण कामावर होताना दिसतो.
प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे लोकल ट्रेनबाबत अधिक चांगल्या सुविधा देणं गरजेचं ठरत आहे. अशात पश्चिम रेल्वेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे सेवांना चालना देण्यासाठी एक रोडमॅप तयार केला आहे.
हा रोडमॅप (roadmap) तीन वर्षांचा असेल अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी दिली. मुंबई (mumbai) भेटीदरम्यान त्यांनी ही योजना सादर केली आहे.
खार रोड (khar road) आणि डहाणू रोड (dahanu road) दरम्यान नव्या मार्गांचं बांधकाम सुरू आहे. नवीन रेल्वे कॉरिडॉर पूर्ण झाल्यास याचा मोठा फायदा होईल. यामुळे उपनगरीय लोकल वाहतूक आणि एक्सप्रेस गाड्या यांचे मार्ग वेगळे होतील.
लोकल आणि मेल यांचे मार्ग वेगळे झाल्यामुळे लोकलला येणारे अडथळे दूर होतील आणि प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल. प्रवास अधिक जलद आणि विना अडथळे होण्यास मदत होईल.
5 नोव्हेंबर 2023 रोजी वांद्रे टर्मिनस आणि गोरेगाव दरम्यानचा सहावा मार्ग सुरू झाला. त्यानंतर 7 ऑक्टोबर 2024 रोजी गोरेगाव-कांदिवली मार्ग सुरू झाला. ऑक्टोबर 2025 पर्यंत कांदिवली-बोरिवली हा मार्ग तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे वांद्रे टर्मिनस-बोरिवली कॉरिडॉर पूर्ण होईल.
तर बोरिवली (borivali) आणि विरार (virar) दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाची योजना सध्या मंजुरीच्या टप्प्यात आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर डिसेंबर 2027 पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे.
पश्चिम रेल्वे (western railway) मार्गावर विरारच्या पुढे आताच्या परिस्थितीत केवळ दोन मार्ग आहेत. त्यामुळे लोकल रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मात्र डिसेंबर 2026 पर्यंत विरार आणि डहाणू दरम्यान तिसरा आणि चौथा मार्ग तयार होईल. त्यामुळे लोकलसाठीचा अडथळा दूर होईल.
हेही वाचा