रेल्वेमंत्र्यांची माटुंगा रेल्वे स्टेशनला भेट, महिला सशक्तीकरणाचं दिलं आश्वासन

सन २०१८-१९ या वर्षात महिला सशक्तीकरणावर भर देण्यात येईल, असं आश्वासन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलं. रविवारी दुपारी संपूर्ण महिला कर्मचारी असलेल्या मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाची रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी पाहणी केली. 

या स्थानकावर आणखी काय बदल करता येतील? यासंदर्भातील पाहणी गोयल यांनी केली. शिवाय माटुंगा स्थानकात सर्व प्रकारचं काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचं कौतुकही रेल्वेमंत्री गोयल यांनी केलं. संधी दिल्यास महिला कुठल्याही कामात मागे नाही, असे उद्गार गोयल यांनी काढले.

आणखी काय म्हणाले गोयल?

  • सन २०१८- २०१९ मध्ये फक्त महिला सशक्तीकरणावर भर
  • लोकल ट्रेनमध्ये लावणार सीसीटिव्ही
  • सीसीटिव्ही फुटेजही लोकल पोलीस ठाण्यात जाणार
  • रेल्वेतील तंत्रज्ञान सुधारण्यावर भर देणार

शिवाय, रेल्वेतील सुधाणांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणं केलं असून लवकरच निर्णय घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या