लोहमार्ग पोलिसांचा झोपडपट्टीधारकांना सतर्कतेचा इशारा

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

वडाळा - चेंबूर पूर्व रेल्वे स्थानकालगतच्या गरीब भारतीय रहिवासी संघ झोपडपट्टीतील स्थानिक रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी आणि वाढत्या अपघातांवर निर्बंध आणण्यासाठी गुरुवारी वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वतीने बैठक घेण्यात आली. यात 50 हून अधिक झोपडपट्टीधारक सहभागी झाले होते.

तर होळी- धुलिवंदन हे सण जवळ आल्याने झोपडपट्टीतील मुलांनी धावत्या लोकलवर दगड, फुगे अथवा तत्सम पदार्थ मारू नयेत. तसंच एखादा प्रवासी लोकलमधून खाली पडल्यास त्यास तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 

विशेष म्हणजे दिवसेंदिवस रेल्वे रुळावर घातपात घडवून आणण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे स्थानकांच्या नजीक संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू आढळल्यास किंवा एखादी महत्त्वाची माहिती देण्यासाठी पोलिसांच्या 9833331111 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा असं आवाहन पोलीस उपनिरीक्षक सदाशिव खोत यांनी या बैठकीत केले. या वेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या