मस्जिद स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे

मस्जिद रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळाला तडे गेल्याने हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रुळाला तडे गेल्याने पनवेलकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

वाहतूक उशिराने

आठवड्याची सुरुवात होताच हार्बर मार्गावरील मस्जिद स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्यामुळे हार्बर मार्गावरील पनवेलकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, सकाळच्या वेळेस रेल्वे रूळाला तडे गेल्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावं लागत आहे. सकाळची वेळ असल्याने रुळ दुरुस्तीचं काम रेल्वेकडून तातडीने हाती घेण्यात आले. त्याचप्रमाणे रुळ दुरुस्तीचं काम करण्यात आलं असून पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक ५ ते ७ मी उशिराने धावत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या