एल्फिन्स्टन अपघातग्रस्तांना मदत जाहीर

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीत मृत आणि जखमी झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना त्वरीत मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एल्फिन्स्टन दुर्घटनेतील ३९ अपघातग्रस्तांपैकी ३७ अपघात ग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे आदेश रेल्वे दावा लवादाने पश्चिम रेल्वेला दिले आहे. तर, उर्वरित दोन प्रवाशांबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

मृतांच्या नातेवाईकांना ८ लाखांची मदत

एल्फिन्स्टन दुर्घटनेतील अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी ९ ते ११ आॅक्टोबर २०१७ रोजी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित नातेवाईंकांना आवश्यक कागदपत्रांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती. शिवाय, या घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना रेल्वेकडून प्रत्येकी ८ लाखांची आर्थिक मदत जाहीर झाली आहे. तर, गंभीर जखमींना ७ लाख आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपये मदत मिळणार आहे.

३७ जणांना तात्काळ मदत

या घटनेनंतर रेल्वेकडून एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने जवळपास ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. यानंतर या दुर्घटनेला पाऊस आणि अफवा जबाबदार असल्याचा निकाल देण्यात आला. एकूण ३९ जणांनी मदतीसाठी अर्ज केला होता. पण, यामध्ये ३७ जणांना तात्काळ मदत देण्यात येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या