युक्रेनमधून भारतात येणाऱ्यांसाठी रेल्वेचाही पुढाकार

युक्रेनमधून (Ukraine) मुंबईत येणाऱ्यांसाठी रेल्वेनं रिझर्व्हेशन आणि हेल्प डेस्क अशी सुविधा सुरू केली आहे. मुंबईतली छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

विमानतळावरील टर्मिनल २ लेव्हल पी ४ गेट नंबर ४ या ठिकाणी रेल्वेनं आपला मदत कक्ष स्थापन केला आहे. युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या गावी जाण्यासाठी या मदत कक्षाद्वारे रेल्वेकडून विशेष आरक्षणाची सुविधा पुरवली जाणार आहे.

रेल्वेच्या या पुढाकरामुळे केंद्र सरकारच्या ‘ऑपरेशन गंगा’ मोहीमस एकप्रकारे अधिकची मदतच होत आहे.

राजाधीन दिल्लीमध्ये देखील युक्रेनमधून आलेल्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सदनात मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी आलेल्या विद्यार्थ्यांना जेवण, राहण्याच्या व्यवस्थेसह त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे.

युक्रेनच्या खार्कीव्ह आणि अन्य युद्धग्रस्त शहरांतून भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्याबाबत रशिया आणि युक्रेनच्या दूतावासाबरोबरच उभय देशांतील भारतीय दूतावासांशी संपर्कात आहेत.

युद्धग्रस्त भागांतून भारतीयांना सुरक्षित बाहेर पडू देण्याबाबत २४ फेब्रुवारीपासून या दोन्ही देशांकडे वारंवार मागणी करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी हे हंगेरी, ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानिया, किरेन रिजीजू हे स्लोव्हाकीया आणि जनरल व्ही़ क़े सिंह यांना पोलंडमध्ये पाठवण्यात आले आहे.


हेही वाचा

८ वर्षांनंतर मुंबईला मिळणार नवीन मेट्रो लाईन, 'मेट्रो ७'चे दर ठरले

मुंबईत लोकल प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस अनिवार्य

पुढील बातमी
इतर बातम्या