सीएसएमटी मुख्यालयात आता वाहतूक वास्तुसंग्रहालय

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

मध्य रेल्वेचं मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या हेरिटेज इमारतीत जागतिक दर्जाचं वाहतूक वास्तुसंग्रहालय बनवण्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. शिवाय त्यासाठी लागणाऱ्या विविध स्थापत्य आर्किटेक्टकडून विविध डिझाइन्स मागवण्यात आल्या आहेत.

या कामासाठी इमारतीतील तळ मजल्यावरील विविध कार्यालयांना हलवण्यात येणार असल्यामुळे अनेक कामगार संघटनांसह कर्मचाऱ्यांनीही नाराजी दर्शवली आहे.

रेल्वेने आर्किटेक्टकडून मागवले डिझाइन्स

१२९ वर्षे पुरातन असलेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही गाॅथिक शैलीतील इमारत मध्य रेल्वेचे मुख्यालय म्हणून ओळखली जाते. या इमारतीच्या तळमजल्यावर रेल्वे, ट्राम, बेस्ट आदी मुंबईतील पुरातन वाहतूक यंत्रणांचे वास्तुसंग्रहालय निर्माण करण्यात यावं यासाठी रेल्वेमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे.

त्यासाठी आभा नारायण लांबा आणि विकास दिलावरी यांची मदत घेतली आहे. वास्तुसंग्रहालय तयार करताना त्याचे डिझाईन ठरवण्यासाठी आता निविदा मागवण्यात आल्या आहेत.

खर्च किती?

रेल्वेच्या राइट या संस्थेने या निविदा मागवल्या असून येत्या ९ मार्चला निविदापूर्व बैठक ठेवण्यात आली आहे. त्यामुळे, जगात सर्वाधिक फोटोज घेतल्या जाणाऱ्या या इमारतीत यापुढे पर्यटकांची गर्दी दिसणार आहे.

या इमारतीत जागतिक दर्जाचं वास्तुसंग्रहालय तयार करण्यासाठी रेल्वेने ६८ कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले असून नव्या हेडक्वॉर्टरसाठी ८५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या