अखेर मध्य रेल्वेची 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' रवाना

रो-रो सेवा माध्यमातून ७ रिक्त टँकर असलेली मालगाडी विशाखापट्टणम इथं जाण्यासाठी सोमवारी कळंबोली माल यार्डातुन रवाना झाली. कोविड-१९ विरोधातील लढ्याला सामोरे जाताना रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याची तयारी केली आहे. 

रो-रो सेवा ७ रिक्त टँकरसह असलेली मालगाडी वसई रोड, जळगाव, नागपूर, रायपूर जं मार्गे ईस्ट-कोस्ट रेल्वे झोनमधील विशाखापट्टणम स्टील प्लांट साइडिंगकडे जाईल जिथे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन असेल. ही गाडी सोमवारी ८.०५ वाजता कळंबोली यार्डातुन रवाना झाली.

गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्येही रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि पुरवठा साखळी कायम ठेवली आणि आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्राची सेवा सुरू ठेवली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या